भिवंडीत इमारत कोसळली पहा हा व्हिडिओ | Mumbai Latest News

2021-09-13 1

कल्याण- भिवंडी रस्त्यावर नवी वस्ती हा परिसर आहे. डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. नवी वस्ती परिसरात शुक्रवारी सकाळी साडे आठच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. या इमारतीत 10 ते 12 कुटुंब राहत होती. ही इमारत 5 वर्षे जुनी असून इमारत धोकादायक असल्याचे समजते. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. बचावकार्यासाठी NDRF च्या पथकाची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. ही इमारतही अनधिकृत असू शकते, असे सांगितले जाते. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असून अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनास्थळी मदतकार्याला सुरुवात झाली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires